Share

निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ;आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे : संजय राऊत

Published On: 

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत सापडलं आहे. त्यातच विरोधी पक्ष भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेत थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच स्वतः धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा न घेतल्यास भाजप राज्यभर आंदोलन करत रस्त्यावर उतरेल, असाही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता ठाकरे सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीचे नेतेच ठरवतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.‘राजकारणात शिखरावर जाण्यासाठी कष्ट करावे लागतात, आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे’असे त्यांनी म्हटले.

दुसऱ्या बाजूला भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी.पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये.कितीही मोठा नेता असु दे दोषींना पाठिशी घालू नका.जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे. अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबियांवर दबाव येऊ शकतो.पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते.तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. नैतिकता दाखवत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावं असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!