🕒 1 min read
सिंधुदुर्ग : कोरोनाच्या संकटात स्वतः रस्त्यावर उतरून भाजप आ. नितेश राणे यांनी जनतेची जनजागृती केली आहे. घरी राहा सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. हातात माईक घेऊन फोंडाघाट बाजारपेठेतुन नितेश राणे यांनी जनजागृती केली.
कोरोनामुळे सर्वच राज्य बेजार झाले आहे. मुंबई – पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवरचं सिंधुदुर्गच्या जनतेला जागृत करण्यासाठी नितेश राणे हे रस्त्यावर उतरले व त्यांनी जनतेला काही सूचना केल्या. घरी राहून कोरोनाशी लढा आणि प्रशासनाला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनामुळे नितेश राणे स्वतः मुंबईत अडकले होते. मात्र मुंबईतून सिंधुदुर्गला आल्यानंतर ते स्वतः काही दिवस होम क्वारंटाईन होते. त्यानंतर तपासणी करूनचं ते बाहेर पडले. बाहेर पडताच त्यांनी जनतेच्या जनजागृती साठी हातात माईक घेऊन सूचना केल्या. आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडल्याने नितेश राणे आंबा विक्रीसाठी बिग बाजार, रिलायन्स, महिंद्रा सारख्या मोठ्या मॉलमध्ये आंबा पाठविण्याचा पर्याय खुला करून दिला.
दरम्यान कोरोनामुळे नितेश राणे मुंबईत अडकले असले तरी मतदार संघासह जिल्ह्यावर त्याचं लक्ष होत. मुंबईत असतानाही जिल्ह्यात सर्वप्रथम २ लाख मास्क पाठवून दिले. २ लाख मास्कचे प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात वाटप करण्यात आलं . तसेच इथल्या आरोग्य यंत्रणेजवळ पीपीई किट नसल्याचं लक्षात येताच १ हजार पीपीई किट देखील पाठवून दिले.
नाही तर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान | Shree Shivpratishthan |
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
