मुंबई- कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आले असून चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत आहे. किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक भागाला तडाखा बसणार आहे.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकलं आहे. वादळानं जमिनीला स्पर्श केला असून, तांडव सुरू झालं आहे. नुकसानीची असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. आमदार नितेश राणे यांनी चक्रीवादळात डौलानं फडकणारा भगवा झेंडा आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर "कितीही वादळं येऊ द्या…, काही फरक पडत नाही, जय शिवराय!,’ असं म्हटलं आहे.
किती ही वादळं येऊदया…
काही फरक पडत नाही!!
!!जय शिवराय!! pic.twitter.com/g2vGiddXUs— Nitesh Rane (@NiteshNRane) June 3, 2020
दरम्यान, या वादळाचा प्रकोप कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना देखील जाणवणार आहे. सध्या किनारपट्टी भागात ताशी १०० हून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. ज्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडत आहेत.रत्नागिरीत तर काही घरांवरील पत्रेही उडून जात आहेत. सध्या या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर इथून राज्यात एन्ट्री केली आहे.
#Ratnagiri #NisargaCyclone
दापोली येथील काही इमारतींवरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले आहेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही.@CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoDivKonkan @DMRatnagiri @DDNational @ddsahyadrinews @abpmajhatv pic.twitter.com/5hnNtdH0Y4— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) June 3, 2020
या वादळामुळे कच्ची घरे आणि झोपड्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक भागात घरावरची पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी वीज आणि दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, अलिबाग परिसरात मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडली आहे.याचा सर्वाधिक परिणाम हा रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, दिवे-आगार, अलिबाग, मुरुड येथील किनारपट्टी भागाला बसला आहे. या वादळावर सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

