Share

‘रस्त्यांचे २७ हजार कोटी खिशात ओतले, मुंबईला अपघातात नंबर एक केले’

Published On: 

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. मुंबई चालू वर्षातील सर्वाधिक रस्ते अपघातांचे शहर ठरले आहे. पहिल्या १० महिन्यांत राज्यातील सर्वाधिक १६६० रस्ते अपघात मुंबईत झाले आहेत. आता यावरूनच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane)यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधत टीका केली आहे.

रस्त्यांचे २७ हजार कोटी खिशात ओतून दाखवले. मुंबईला अपघातात क्रमांक १ करून दाखवले. वेळेच्याआधी पोहचवून दाखवले! अशा आशयाचे ट्वीट करत नितेश राणे यांनी बीएमसी तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोबतच त्यांनी व्यंगचित्रही पोस्ट केले आहे.

दरम्यान राज्यात ऑक्टोबरअखेरीस २३,६२१ अपघातांची नोंद झाली असून यात २९,०३४ प्रवासी अपघातग्रस्त झाले. यात १० हजारांहून जण मृत्युमुखी पडले. तर, जखमींची संख्या १८ हजारांहून अधिक आहे. रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाल्याने शहरातील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मेट्रो शक्य तितक्या लवकर सुरू झाल्यास अपघातांमध्ये घट होण्याची शक्यता आहे, असे मत रस्ते वाहतूकतज्ज्ञ विवेक पै यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!