🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयदशमी उत्सवात सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर लक्ष्य ठरलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व कणकवलीचे भाजप उमेदवार नीतेश राणे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
आपण ज्या पक्षात आहोत त्याची मातृसंस्था समजून घेणं आवश्यक आहे. त्यांची कार्यपद्धती काय आहे, कार्यकर्ते कसं काम करतात हे समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे मी काही पुस्तकं देखील घेतली आहेत. अस नितेश राणे म्हणाले आहेत. तर, काँग्रेसमध्ये असताना 12 वर्षं लोकांची नाव कळण्यातच गेली पण या ठिकाणी आम्ही सर्व काही समजून घेऊन काम करू असं देखील राणे म्हणाले.
नीतेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं नीतेश यांना तिकीट दिलं असलं तरी शिवसेनेनं त्यांच्या विरोधात सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळं नीतेश यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच भाजपचे कार्यकर्ते त्यांना मनापासून मदत करतील का, याबाबत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी नीतेश यांनी प्रयत्न चालवले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183335974408818688?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183335901889323008?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
