Share

निर्भया प्रकरण : हरामखोरांना वेळ का वाढवून दिला जातोय ; चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

Published On: 

पुणे : निर्भया प्रकरणामधील सगळ्याच आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. महाराष्ट्र देशा सोबत बोलताना त्यांनी फाशीला मिळालेली स्थगिती दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर हरामखोरांना वेळ का वाढवून दिला जातोय? असा संतप्त सवाल देखील वाघ यांनी उपस्थित केला आहे. मुलींना छेडण्याची हरामखोरांची हिमंत होतेच कशी ? असेही त्यांनी म्हटले आहे.

धुळ्यातील घटनेवरून देखील चित्रा वाघ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वसतिगृहाचे प्रशासन कुणाला पाठीशी घालतंय असा सवाल उपस्थित करत त्यांनी मेडिकल टीम्स वर कारवाई करा अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे आदिवासी मुलींची सुरक्षा धोक्यात आली असून सरकारला कारवाई करायला भाग पाडू असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

दरम्यान, दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील निर्भयाच्या आईने पुन्हा दोषींची फाशीची शिक्षा कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत टळल्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याच्या स्वत: च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्ट इतका वेळ का घेत आहे? असा सवाल निर्भयाची आई आशादेवी यांनी उपस्थित केला. तसेच वारंवार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलणं हे आपल्या सिस्टमचे अपयश दर्शवते आणि आपली संपूर्ण सिस्टम गुन्हेगारांना अभय देते असल्याची कटू प्रतिक्रिया ही त्यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!