नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चार दोषींना आज फाशीची शिक्षा देण्यात आली. दोषींच्या फाशीपूर्वी तुरूंगाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तब्बल ७ वर्ष ३ महिन्यांनंतर आज निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
‘कठोर शिक्षा जेव्हा देतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात. कायद्यामध्ये संशोधनाची गरज आहे.जर कोणी कायद्याशी खेळतं किंवा चॅलेंज करतं ते चुकीचं आहे,’ असं मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,’लोकांमध्ये कायद्याप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी याचिका कितीवेळा केली पाहिजे यावर विचार झाला पाहिजे. रिव्ह्यू पिटीशनसाठीही मर्यादा असायला हवी, असं मत ज्येष्ठ वकील निकम यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, आपल्या मुलीला न्याय मिळाल्यानंतर निर्भयाची आई आशा देवीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर ‘तुला’ न्याय मिळाला. हा दिवस देशातील मुलींना समर्पित आहे. मी न्यायालयीन व सरकारचे आभार मानते अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
