Share

अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत ‘आई’ झाली भावूक

Published On: 

नवी दिल्ली : देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कारकांडातील चार आरोपींना तिहार कारागृहात आज पहाटे फासावर लटकवण्यात आले. गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला.

२० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धातास महत्त्वाचा होता, अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले.

आपल्या मुलीला न्याय मिळाल्यानंतर निर्भयाची आई आशा देवीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर ‘तुला’ न्याय मिळाला. हा दिवस देशातील मुलींना समर्पित आहे. मी न्यायालयीन व सरकारचे आभार मानते अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

तसेच ‘सर्वोच्च न्यायालयातून परत जाताना मी प्रथम माझ्या मुलीच्या फोटोला मिठी मारून तुला न्याय मिळाला आहे. आमच्या मुलीने जितका त्रास सहन केला आहे तो देशातील इतर कोणत्याही मुलीला होऊ नये. म्हणून आम्ही तिच्या मृत्यूनंतरही ही दीर्घ लढाई सुरुच ठेवली. त्यांना अखेर फाशी देण्यात आली, बलात्कार पीडित आरोपींना देशात प्रथमच फाशी देण्यात आली,’ असं त्यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!