🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – मुंबई : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी यामुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले केंद्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण मुंबईऐवजी गांधीनगर, गुजरात येथे स्थापन करण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाबाबत शिवसेनेला टीका करण्याचा अधिकार नाही कारण २०१७ मध्ये शिवसेना भाजप सोबत सत्तेत असताना हा निर्णय झाला आहे.
निलेश राणे यांचं ट्वीट –
‘शिवसेनेचं नेतृत्व कधीच सुधारणार नाही. मुख्यमंत्र्याच्या आमदारकीसाठी वाकून भीक मागत होते, आता गरज संपल्यावर परत बीजेपी वर टीका चालू झाली. महाराष्ट्राची अस्मिता वगैरे विषयावर बोलायचा अधिकार शिवसेनेकडे नाही. युतीच्या काळात झालेला निर्णय बीजेपी वर ढकलून शिवसेना हात झाडू शकत नाही.’
‘IFSC चा प्रस्ताव २०१५ ला तयार झाला आणि २०१७ डिसेंबरला अरुण जेटली ह्यांनी IFSC अहमदाबाद मध्ये होणार हे जाहीर केलं. तेव्हा युतीचं सरकार होतं आणि तेव्हा पासून सुभाष देसाई उद्योग मंत्री आहेत. शिवसेना आता विरोध का करतेय?? तेव्हा झोपले होते का???’
शिवसेनेचं नेतृत्व कधीच सुधारणार नाही. मुख्यमंत्र्याच्या आमदारकीसाठी वाकून भीक मागत होते, आता गरज संपल्यावर परत बीजेपी वर टीका चालू झाली. महाराष्ट्राची अस्मिता वगैरे विषयावर बोलायचा अधिकार शिवसेनेकडे नाही. युतीच्या काळात झालेला निर्णय बीजेपी वर ढकलून शिवसेना हात झाडू शकत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 4, 2020
बघा श्री पृथ्वीराज चव्हाण IFSC बद्दल काय म्हणतायत. शिवसेना पक्ष किती खोटं बोलतो लक्षात येईल. २०१७ मध्ये युती असताना निर्णय आणि बोंबाबोंब २०२० मध्ये. pic.twitter.com/FEdU8gTHMg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 4, 2020
IFSC चा प्रस्ताव २०१५ ला तयार झाला आणि २०१७ डिसेंबरला अरुण जेटली ह्यांनी IFSC अहमदाबाद मध्ये होणार हे जाहीर केलं. तेव्हा युतीचं सरकार होतं आणि तेव्हा पासून सुभाष देसाई उद्योग मंत्री आहेत. शिवसेना आता विरोध का करतेय?? तेव्हा झोपले होते का???
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 3, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

