मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून निमंत्रितांची यादीही तयार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी मी अयोध्येला जाणार नाही,’ असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.
राम मंदिर बांधून कोरोना जाणार का? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं. भाजपने पवारांवर टीका देखील केली होती. दरम्यान, शरद पवार यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्प्ष्ट केली. शरद पवार म्हणाले, राम मंदिराबाबत कोणताही वाद नसून सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे. मी राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे.
यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं… एवढं मात्र खरं पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय’. अस ट्विट करत निलेश राणे यांनी पवारांवर हल्ला चढवला आहे.
बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं… एवढं मात्र खरं पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय. https://t.co/4ipvWtdbZJ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 28, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

