Share

बरं झालं त्या कारट्याला लायकी दाखवली, राष्ट्रवादीतल्या अनेक मित्रांनी माझं अभिनंदन केलं – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सतत खरमरीत शब्दात ट्विटवरून राज्य सरकार आणि शिवसेनेला लक्ष्य करणारे माजी खा. निलेश राणे यांनी आपला मोर्चा आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राचा हवाला देत साखर कारखान्यांचे ऑडीट करा, असे ट्विट निलेश राणे यांनी केले होते. यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. यावरून या ट्विटर वॉरला सुरवात झाली.

मात्र आता हे ट्विटर वॉर थांबण्याचे नाव घेईना. यातच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही रोहित पवार यांची बाजू लावून धरली. मात्र निलेश राणे यांनी तनपुरे यांना धमकी वजा इशारा दिला. यावरून रोहित पवारांनी पुन्हा ट्विट करत निलेश राणेंना उत्तर दिले. रोहित पवार म्हणाले की, आपले विचार,आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो. असा टोला रोहित पवारांनी लगावल्या नंतर निलेश राणेंनी पुन्हा एकदा रोहित पवारांवर शरसंधान साधलं आहे.

राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही (काही तृतीयपंथी सोडून) हे मागच्या दोन तीन दिवसात स्पष्ट झालं. राष्ट्रवादी पक्षातल्या अनेक मित्रांनी फोन करून माझं अभिनंदन केलं की बरं झालं त्या कारट्याला त्याची लायकी दाखवली… खूप उडत होता. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

तर, राजकारणात बसलेला पहिला शब्दिक झटका माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहतो, वेळोवेळी आपली लायकी काय याची आठवण करत राहतो. पवार आडनाव असल्यामुळे मला कोण काही बोलणार नाही पण मी काही बोलू शकतो हे भ्रम तुटायला ४८ तास पण लागले नाही. असा टोला निलेश राणे यांनी रोहित पवार यांना लावला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!