सिंधुदुर्ग: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत. अनेक डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस ते राजकारण्यांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीदेखील कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वैभव नाईक यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. लॉकडाऊनच्या काळात नाईक यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरा केला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वैभव नाईक हे दोन-तीन दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत दौऱ्यासोबत होते. आमदार नाईक यांच्या सहवासात जिल्ह्यातील अनेक लोकं आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील बहुसंख्य अनेक पदाधिकारी संपर्कात आलेले आहेत.
रेड्याला कोरोना होऊ शकतो??? तपास करा कोरोना मेला असेल. मागच्या २ दिवसात हा रेडा अनेकांच्या संपर्गात आलाय त्यात डांबर चोर उदय सामंत पण आहे. https://t.co/XLQgXHRtX5 pic.twitter.com/pCgr865YQb
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 21, 2020
दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळीदेखील टीका करण्याची संधी सोडली नाही. रेड्याला कोरोना होऊ शकतो??? तपास करा कोरोना मेला असेल. मागच्या २ दिवसात हा रेडा अनेकांच्या संपर्कात आलाय त्यात डांबर चोर उदय सामंत पण आहे असं म्हणत नाईक आणि सामंत यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय, ठाकरेंच्या समर्थनार्थ कॉंग्रेस मैदानात
दुध दरवाढीसाठी स्वभिमानीचे आक्रमक आंदोलन
दूध दर आंदोलन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात
‘मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

