Share

पत्रकार मारहाण प्रकरणी कडक कारवाई करा – नीलम गो-हे

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी मुजोरपणाने वार्ताहराला मारहाण करून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याबाबत चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन आज पुण्याचे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे आ. डॉ. नीलम गो-हे यांनी केली.

मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लोकसत्ताचे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केली होती.

यावेळी शासकीय अधिकारी प्रसाद आयुष यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले असता आयुष यांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी करून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर आयुष तेथून निघून जात असताना भुकेले यांनी आंदोलनाशी संबंधित काही प्रश्न आयुष यांना विचारले आणि उत्तराचे त्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले.

आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे हे भुकेले यांच्याकडे आले. ‘तू मोबाइलवर रेकॉर्डिंग का करतो’ अशी दमबाजी त्यांनी केली. वार्ताहर असल्याचे मोरे यांना ओळखपत्रही दाखविले. भुकेले यांनी मोबाइलवर केलेले रेकॉर्डिंग काढून टाकण्याची मागणी सुरुवातीला आयुष यांनी केली. भुकेले यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर मोरे यांचा पारा चढला. त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांनी भुकेले यांना ओढून नेत थेट पोलीस व्हॅनमध्ये बसविले. पोलीस व्हॅनमध्येच भुकेले यांना मारहाण केली.

त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन भुकेले यांना थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेण्यात आला. ही घटना गंभीर असल्याने याबाबत श्री. मोरे यांची चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आ. डॉ. नीलम गो-हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!