Share

कोरेगाव भीमा चौकशी प्रकरणी एन.आय.ए.ची टीम आज दिवसभर पुण्यात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. मार्फत करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. पण केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन.आय.ए. कडे देऊन एक प्रकारे राज्य सरकारवर कुरघोडी केली होती.

याच प्रकरणात पुढील चौकशी साठी एन. आय. ए. ची टीम आज दिवसभर पुण्यात कमिशनर ऑफिस येथे येऊन थांबली होती.पण पोलीस महासंचालक यांच्याकडून कुठलेही आदेश न आल्यामुळे कागदपत्र आणि तपासासंबंधी कुठल्याही बाबी हस्तांतरित करता येणार नाही असा खुलासा करत पुणे पोलिसांनी कागद्पत्र एन.आय.ए. कडे हस्तांतरित करायला नकार दिला आहे.

एन.आय.ए.ने सकाळीच पोलीस महासंचालकांशी पत्रव्यवहार केला होता.पण त्यावर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याचे सांगण्यात आले आहे.याप्रकरणात पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!