🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : चीनमध्ये उगमस्थान असणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर, तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. भारतातही आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३१ वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.
– साथरोग प्रतिबंधात्मक कायदा म्हणजे काय ?
साथरोग रुग्णसंख्येत एखादया ठिकाणी ठराविक वेळेत अचानक वाढ झाल्यास त्याला साथरोग उद्रेक म्हणतात. आपल्याला आढळणा-या दैनंदिन रुग्णांमध्य प्रामुख्याने ताप, अतिसार, खोकला इत्यादि लक्षणांचे रुग्ण जास्त प्रमाणात असतात. साथरोग आजाराबाबत रुग्ण संख्या मर्यादित राहील व पर्यायाने मृत्यू टाळता येईल. यादृष्टीने विशेष प्रयत केले जातात. यासाठी गावभेटी मध्ये आरोग्य कर्मचा-यामार्फत घरोघर सर्वेक्षण केले जाते. आजारी व वृद्ध व्यक्ती ओळखून त्वरित औषध उपचार केला जातो.
– साथरोगांवर प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्माक उपयायोजना
१ ग्रामपंचायत नगरपालिका/महानगरपालिका अथवा जिल्हा परिषद यांच्या अंदाज पत्रकात ब्लिचिंग पावडरच्या खरेदीबाबत पाठपुरावा करणे.
२ साथरोग नियंत्रणासाठी औषधांचा व इतर साहित्यांचा पुरेशा साठा नगरपालिका, जिल्हा परिषदा व महानगरपालिका यांचेकडे उपलब्ध असतो. तसेच या कार्यालयामार्फतही अत्यवश्यक औषध साठा पुरविला जातो.
३ पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करुन शुध्द पाणी पुरवठा करण्याबाबत संनियंत्रण करणे.
४ रुग्ण सर्वेक्षण करणे साथरोगाच्या नियंत्रणासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण नियमित चालू असते. नियमित सर्वेक्ष्ण हे तुरळक रुग्ण व सहवासित शोधणे यासाठी देखील उपयोगी ठरते.
५ सर्व साथीच्या आजाराच्या रुग्णावर तसेच सहवासितांवर उपचार करण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याठिकाणी उपचार व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात येते.


