Share

महानायक अमिताभ बच्चन यांना “50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार” जाहीर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय चित्रपटसृष्टीवर गेल्या 50 वर्षांपासून कसदार अभिनयाने गारूड घालणारे महानायक अमिताभ बच्चन यांना येत्या 29 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या समारंभात सांगितले. महानायक अमिताभ बच्चन यांना ‘50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘पाणी’, ‘नाळ’, ‘चुंबक’, ‘तेंडल्या’, ‘खरवस’ आणि ‘आई शप्पथ’ या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटांसाठी एकूण 10 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिग्दर्शकाचा पदार्पणातील चित्रपट म्हणून ‘नाळ’ या चित्रपटाला ‘इंदिरा गांधी पुरस्काराने’ गौरविण्यात आले. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी येंकटी आणि निर्माता तथा मृदगंध फिल्म्सचे नागराज मंजुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रत्येकी स्वर्ण कमळ आणि 1 लाख 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नॉनफिचर मध्येही मराठीचा सन्मान

नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली ‘आई शप्पथ’ या चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक गौतम वझे यांनी पुरस्कार स्वीकारला. स्वर्णकमळ आणि 1 लाख 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘खरवस’ हा सर्वोत्तम लघु काल्पनिक चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे आणि निर्माती संस्था श्री म्हाळसा प्रोडक्शन पोंडा यांना या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘ज्योति’ चित्रपटासाठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत दिग्दर्शक केदार दिवेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘हेल्लारो’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘हेल्लारो’ या गुजराती चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘बधाई हो’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्तम मनोरंजक चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पद्मन’ या हिंदी चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ओंडाल्ला येराडाल्ला’ या कन्नड भाषेतील चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209365575387844609?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209363164610977798?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!