तुळजापूर- तुळजापूर सोलापूर रस्त्यावरील घाटशिळ घाटाखालील बायपास रस्तावरील डाव्या बाजूकडे अर्थात सोलापूरकडे जाण्यासाठी असणारा रस्ता खचू लागला आहे. सर्व्हिस रस्त्यावर सिमेंट नाली बांधकाम न केल्याने हा रस्ता दिवसेंदिवस खचु लागला आहे. या ठिकाणी अपघात होवुन मनुष्यहानी होण्याची शक्यता असल्याने हा रस्ता त्वरीत करण्याची मागणी होत आहे.
तुळजापूर सोलापूर रस्त्यावर बायपासपलगत डाव्या बाजूकडे सोलापूर कडे जाणारा बायपास रस्ता आहे. या रस्त्यावरून तुळजापूर कडे सर्व लहान मोठी जड वाहने सोलापूर कडे जातात. या रस्त्यावर सिमेंट नाली बांधकाम केले आहे माञ पुलापासुन पुढे रस्त्यावर काही अंतरावर सिमेंट नाली बांधकाम न केल्याने डांबरी रस्ता दिवसेंदिवस खचु लागला आहे.
राञी हा खचलेला रस्ता दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे.हा रस्ता अनेक महिन्यापासुन अशाच अवस्थेत आहे. रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

