Share

नवीन रुपात भारतात लाँच झाली जावा २.१ अपडेटेड फीचर्स जाणून घ्या किंमत

Published On: 

नवी दिल्लीः तरुणाईची क्रेज असलेल्या जावा फोर्टी टू बाईक आता नव्या रुपात येत आहे. दुचाकी निर्माती कंपनी जावाने नवीन व्हेरियंटमध्ये जावाला भारतात लाँच केले आहे. हि बाईक सर्वात आधी भारतात आली होती आता या बाईकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जसे की, आकर्षक रंग आणि लूक देण्यात आला आहे. आजपासून ही बाईक संपूर्ण भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

ही बाईक डीलरशीपकडे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर कंपनीने आपल्या आणखी दोन मॉडल जावा आणि पर्क या गाड्या देखील अद्ययावत केल्या आहेत. या निमित्ताने क्लासिक लिजंड्सचे सीईओ आशिष सिंग जोशी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सर्वांनी जावाच्या बीएस ६ एडिशनला पाहिले होते. आम्ही तेथेच थांबलो नाही. तसेच आपल्या बाईकच्या परफॉर्मन्स आणि एक्सपीरियन्सला आणखी चांगले करीत यात २.१ व्हर्जनमध्ये अपडेट केले आहे. कंपनीने नवीन जावा फोर्टी टू ला आधीच्या तुलनेत आणखी आकर्षक बनवले आहे. यात आधीच्या तुलनेत मोठी सीट, फाइन ट्यूंड क्रॉस पोर्ट इंजिन पंचसाठी दिले आहेत.

आमच्या ग्राहकांनी नेहमीच जावा फोर्टी टू बाईकला रचनात्कम पद्धतीने वापर केला आहे. यासाठी आम्ही तीन कलर ऑप्शन जोडले आहेत. ज्यात ओरियन रेड, सीरियस व्हाइट, ऑलस्टार ब्लॅक सारखे कलर्सचा समावेश आहे. याशिवाय यात अपडेटेड अलॉय व्हील्स, सोबत ट्यूलेस टायर्स आदी पाहायला मिळेल. नवीन जावा फोर्टी टू च्या संपूर्ण रेंज मध्ये फ्लाय स्क्रीन आणि अपडेटेड हँडलँम्प ग्रील पाहायला मिळणार आहे. या बाईकमध्ये आधीच्या प्रमाणे २९३ सीसीचे लिक्विड कूल्ड आणि फ्यूल इंजेक्टेट इंजिन मिळणार आहे. या बाईकमध्ये जास्तीत जास्त २७ बीएचपीचे पॉवर वर २७ एनएम चे पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या बाईकमध्ये पहिल्यांदा सिंगल सिलिंडर इंजिनमध्ये क्रॉस पोर्ट टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या बाईकची किंमत १ लाख ८३ हजार ९४२ रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!