सोलापूर : मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच पहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.
मराठा आरक्षण लागू होवू नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका – नवाब मलिक
मराठा क्रांती मोर्चा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या
- मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
- मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
- राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
- आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
