🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एअर स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने देखील आपल्या वायुसेनेचा वापर करत भारताच्या सीमे लगतच्या काही भागांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न भारताने परतावून लावला. यासाऱ्या हल्ला-प्रतीहाल्ल्यामुळे भारत – पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथील नॉर्थ झोन मध्ये तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता पराराष्ट्र मंत्रालया कडून आता पत्रकार परिषद घेण्यात आली.
यामध्ये सांगण्यात आले की, भारताने आपले एक मिग 21 हे विमान गमावले आहे तसेच भारताचा वैमानिक देखील परतलेला नाही . तर दुसरीकडे पाकिस्तानकडून असे सांगण्यात येत आहे की भारताचे २ वैमानिक पाकिस्तानच्या अटकेत आहे. पण त्यासंदर्भात अजून विश्वसनीय माहिती भारताकडे आलेली नाही. पण भारतीय वायुसेनेच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानच्या वायुसेनेने केलेल्या घूसखोरीला परतावून लावल आहे. तर भारताला पाकिस्तानच एफ 16 विमान पाडण्यात यश आल आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारता आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात भारताने आपल्या ४० जवानांच्या बलिदानाचा बदल एअर स्ट्राईक द्वारे घेतला. या भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरून गेले आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
