Share

भंडारा-गोंदियातील ‘त्या’ मतदान केंद्रावर आज फेरमतदान

Published On: 

भंडारा – भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकी दरम्यान काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी याठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान अशा ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असून, या मतदान केंद्रांवर आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातील ७३ मतदान केंद्रे आणि नागालँडमधील एका मतदान केंद्रावरही आजच फेरमतदान घेण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!