Share

मुस्लीम आरक्षणाच्या बाबतीत शिवसेना मवाळ का? जाणून घ्या ‘हे’ आहे कारण

Published On: 

मुंबई : मुस्लीम आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे. शिवसेनेकडूनही आता मुस्लीम आरक्षणाला समर्थन देण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार असल्याच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात येत्या शैक्षणिक वर्षापासून मुस्लीम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण लागू करू, तसेच त्यासाठी लवकरच अध्यादेश काढण्याचा निर्णय लवकरच घेऊ, असे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता. २८) विधानसभेत जाहीर केले. मात्र या आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत विसंवाद असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

परंतु हे तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार असून किमान समान कार्यक्रमास आमचे सरकार बांधील आहे. असे वक्तव्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे शिवसेनेची मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत मवाळ भूमिका असल्याचे देखील शिंदे यांच्या या वक्तव्यातून सूचित होते.

तसेच मराठा आरक्षणाबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. समान किमान कार्यक्रमानुसार आम्ही निर्णय घेण्यास कटीबद्ध आहोत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात पुढील कारवाई करण्याची घोषणा केली. आमचे सरकार सर्व समाजांच्या हिताचे निर्णय घेईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!