Share

करोना गो! नंतर आठवलेंनी ‘कोरोना’विरोधात ‘ही’ घोषणा; वाचा काय आहे प्रकरण

Published On: 

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनाविरोधात केलेल्या घोषणेने आठवले चांगलेच चर्चेत आले होते. गो करोना, करोना गो! या आगळ्या वेगळ्या घोषणेमुळे आठवले यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आठवले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाविरोधात नवी घोषणा दिली. ‘‘नो करोना, नो करोना! अशी नवीन घोषणा आठवले यांनी दिली. ‘मी वेळ घरातच घालवत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये,’ असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

‘करोना आपल्यापर्यंत पोहचू द्यायचा नसेल तर काळजी घेणं आवश्यक आहे. मी घरात बसून कविता लिहितो, पुस्तकं वाचतो, कॅरम खेळतो, गिटार वाजवण्याचा प्रयत्न करतो,’ असं रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, माझी करोना गो करोना गो ! घोषणा जगभरात प्रसिद्ध झाली. आता मी म्हणतोय नो करोना, नो करोना. करोना गो ही माझी भावना होती,’ असं स्पष्टीकरण देखील आठवले यांनी दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!