तुळजापूर : कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी भारत देशाला लॉकडाऊन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्व प्रकारचे लहान आणि मोठे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहे. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सर्व राष्ट्रीयकृत बँकांना पुढील तीन महिन्यांपर्यंत ग्राहकांचा हप्ता थांबविण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामजी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
देशात विविध प्रकारच्या वित्तीय संस्था (वित्तीय बँक , खासगी बँक, पतसंस्था, सहकारी बँक आणि इत्यादी वित्तीय संस्था) देशभरातील ग्राहकांकडून गृह कर्ज , व्यवसाय कर्ज, शिक्षण कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिला बचत गटांमार्फत महिला सक्षमीकरणाचे उद्दीष्ट देशभरात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहे आणि ते अजूनही चालूच राहील. परंतु आजच्या कठीण परिस्थितीत या बचत गटांचे कर्ज माफ करणे किंवा त्यांच्या हप्त्यांमधील वसुली थांबविणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबवावी , वित्तीय संस्था, वित्तीय बँका, संस्था, सहकारी बँका आणि वित्तीय संस्थांनी त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
