Share

‘लॉकडाऊन’मध्ये प्रवास करणार असाल तर ‘या’ अटींच करावं लागणार पालन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध जिल्हे आणि शहरात अडकलेल्या विद्यार्थी, प्रवासी, पर्यटक, कामगार यांना घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. ज्या शहरात किंवा जिल्ह्यात कंटेनमेंट झोन आहेत, अशा भागातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

प्रवासासाठी या असणार अटी

जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांनी ठरवलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची लोकांची वाहतूक होणार नाही. या झोनमध्ये कोणी आत येणार नाही अथवा इथून बाहेर जाणार नाही.

मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, पिंपरी चिंचवड इथे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली जाईल.

या भागात जिल्हाधिकारी किंवा आयुक्त परवानगी देत नाही, कंटेनमेंट झोनच्या सीमा ठरत नाही. तोपर्यंत या भागातून कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही.

मालेगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या हॉटस्पॉट विभागात कोणतीही प्रवासी वाहतूक होण्याआधी अतिदक्षता घेण्यात यावी.

जे कोणी प्रवास करणार आहेत त्यांच्याकडे डॉक्टरचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ज्यात हे नमूद केलं असेल की त्या व्यक्तीला फ्लू, किंवा फ्लू सारख्या आजारची लक्षणे नाही आणि त्यांचे स्क्रिनिंग करण्याची गरज नाही.

नोडल अधिकाऱ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गंतव्यस्थानी तिथल्या नोडल अधिकाऱ्याला त्या प्रवाशांची माहिती देणे आवश्यक.

तिथला नोडल अधिकाऱ्याने परवानगी दिली की मग प्रवासाला सुरुवात होऊ शकते.

ई पास जे महाराष्ट्र पोलीस वापरतात ती सिस्टीम नोडल अधिकारी पण बदल करून वापरू शकतात.

दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देश 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 35 हजाराच्या पुढे गेली आहे. तर, आतापर्यंत अकराशेहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पाहता आणखी काही दिवस लॉकडाऊन करणे आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी चर्चा झाली. त्यानंतर देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!