🕒 1 min read
मुंबई : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाच्या काळात किती धान्यवाटप झाले याची माहिती दिली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात राज्यातील 1 कोटी 53 लाख 64 हजार 769 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.
राज्यात या योजनेमधून सुमारे 20 लाख 28 हजार 616 क्विंटल गहू, 15 लाख 67 हजार 121 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 305 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 8 लाख 32 हजार 739 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
राज्य शासनाने कोविड-19 च्या संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 APL केशरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन 28 हजार 090 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
RAW : Research Analysis Wing | #भारताची_गुप्तहेर_संघटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
