Share

लातूर जिल्ह्यात मजूर वाहतूक वाहन पासेस देण्याकरिता नवीन अधिकारी नियुक्त 

Published On: 

🕒 1 min read

लातूर :- देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी.श्रीकांत यांनी लातूर जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संदर्भ क्र.०६ च्या आदेशातील सूट दिलेले कारखाने, औद्योगिक आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना प्रवासाकरिता प्रवासी पासेस, मजूर वाहतुकीकरिता लागणाऱ्या बस/मिनीबस/वाहनांचे पासेस देणेच्या अनुषंगाने पुढील अधिकारी यांची त्या कार्यक्षेत्राकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.

प्राधिकृत अधिकारी-महेशकुमार वै.मेघमाळे प्रादेशिक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ लातूर यांनी संदर्भ क्र.०६ च्या आदेशामध्ये सूट दिलेली कारखाने, औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांना प्रवासकरिता प्रवासी पासेस/मजूर वाहतूकीकरिता लागणाऱ्या बस/मिनीबस/वाहनांचे पासेस देण्याची कार्यवाही करावी. व पासेस निर्गमित केलेबाबतचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांचेकडे दैनंदिन पाठविण्यात यावा,असेही या आदेशात नमूद केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!