Share

भारतानेही सुनावले अमेरिकेला, अनावश्यक वाद निर्माण करुन राजकारण करू नका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मागच्या महिन्यात काही औषधांच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. करोना व्हायरसच्या उपचारांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या गोळया प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी शनिवारी मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली, त्यावेळी या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती केली होती. पण सोमवारी वॉशिंग्टनमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन गोळयांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले नाहीत तर, जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली.

दरम्यान, भारतावर अवलंबून असलेल्या शेजारी देशांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करणार आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी अमेरिकेला भारतानेही सुनावलं आहे. “भारत आपल्या शेजारी देशांना व कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल. त्यामुळे यावरुन कुठलेही अंदाज बाधू नका तसेच राजकारणही करु नका” असे अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

“COVID19 ची भयानकता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतेच्या दृष्टीकोनातून एकजूटता आणि सहकार्य केले पाहिजे ही भारताची सुरुवातीपासून भूमिका आहे. आमच्यावर अवलंबून असलेल्या देशांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करु. तसेच अनावश्यक वाद निर्माण करु नका. देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर अन्य देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करण्यात येईल” असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान यावेळी त्यांना भारताने औषधाच्या निर्यातीवर बंदी का घातली ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “सर्वप्रथम आपल्या देशातील जनतेसाठी औषधांचा पुरेसा साठा करुन ठेवणे हे कुठल्याही जबाबदार सरकारचे पहिले कर्तव्य आहे”.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!