Share

‘उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत’ : संजय काकडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो.सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपकडून राज्यसभेचे तीन खासदार निवडून जाऊ शकतात. यातील दोन जागांवर उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झाल असून तिसऱ्या नावावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांना उदयनराजेंची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याचे विचारल्यावर काकडे यांनी उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे, मी पक्षाच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न केले आहेत,असा सवाल उपस्थित केला. तर उदयन राजे हे वंशज असले तर आम्ही सुद्धा सुभेदार आहोत ’ असेही काकडे म्हणाले.

पुढे बोलताना काकडे म्हणाले, ‘मी पक्ष संघटनेसाठी काय प्रयत्न केले आहेत, हे वरिष्ठांना माहिती आहे. मी पक्षाच्या उपयोगाचा आहे, असे त्यांना वाटत असेल तर ते माझ्या नावाचा नक्की विचार करतील. पुण्यातील विधानसभेच्या जागा येण्यासाठी मी किती कष्ट घेतले आहेत, हे अनेकांना माहिती आहे,’ असे काकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, ‘पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर येथे भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. पुणे महापालिकेत पक्षाची सत्ता आणण्यासाठी विविध योजना राबविल्या होत्या. ‘पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची जबाबदारी माझ्यावर होती. तेथेही मी काम केले आहे. या साऱ्याचा विचार पक्षाचे नेते राज्यसभेची उमेदवारी देताना करतील, असा मला विश्वास वाटतो,’ असे संजय काकडे यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!