Share

ब्रिटनसह ‘या’ देशातही आढळले नव्या कोरोनाचे रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. अस असली तरीही पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच. युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे.

त्यानंतर, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या करोना संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर इतर देशांनीदेखील ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केली आहे. नव्या प्रकारचा करोनाचा विषाणू बाधित रुग्ण फक्त ब्रिटनमध्ये नसून इतर देशांमध्येही आहे. इटलीमध्ये एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता इतर देशांमध्ये ही या संसर्गाचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनसह डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि इटलीमध्ये नव्या विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळले असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!