सोलापूर : जगभराची झोप उडवलेला कोरोना व्हायरस सोलापूरकरांची पाठ सोडायला तयार नाही. दिवसेंदिवस या रुग्णात भर पडत चालली आहे. सोलापुरात बुधवारी इंदिरानगर आणि शिवगंगा नगर या परिसरात एकूण तीन रुग्ण आढळून आले आहेत. यातील इंदिरानगर येथील मृत महिलेशी संपर्कात आल्याने आल्याने दोघांना कोरोना झाला आहे तर शिवगंगा परिसरात नव्याने रुग्ण आढळून आला आहे.
गुरुवारी संध्याकाळपर्यंत ९० जणांचे रिपोर्ट हाती आले. त्यापैकी ८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर तीन रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सध्या ३० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
१५० जणांचा अहवाल प्रतीक्षेत
सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या ९०० असून त्यापैकी ७४४ जणांचा अहवाल प्राप्त झाला तर १५० प्राप्त झाले नाही तर ७११ जणांचा अहवाल निगेटिव्ह अाला तर एक ३३ पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.


