Share

वर्षअखेरीस स्वस्त कार घेताय ? थांबा होऊ शकते मोठे नुकसान….

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आता मार्केटमध्ये पुरात अडकलेल्या कार सेकंड हँड कार मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. जर तुम्ही वर्ष अखेरीस सेकंड हँड कार खरेदी करण्याचे नियोजन करत असाल तर थांबा, अशा कार घेताना काही गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या.

१ ) पाण्यात बुडालेल्या कारमध्ये पाण्याचाच वास असतो. डीलर तो लपवण्यासाठी परफ्यूमचा वापर करतात, पण प्रत्येक कोपऱ्यात श्वास घेतल्यास हा वास येईल.

२ ) मॅट वर करून कार्पेटचा ओलेपणा शोधा. कार्पेट पाण्यात भिजते तेव्हा कारमधून बाहेर काढल्याशिवाय सुकवले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे कोपरे उंच होतात.

३ ) डॅमेज कारच्या बूटमध्ये पाण्याच्या खुणा शोधल्या जाऊ शकतात. स्पेअर टायर बाहेर काढून खालचे मटेरियल पाहा. जॅक, जॅक हँडल आणि टूल किट तपासा. गंजल्याच्या खुणा दिसत असल्या तर काही गडबड आहे. जेव्हा स्पेअर व्हीलच्या जागी पाणी जमा होते तेव्हा ते काढणे सोपे नसते. डीलर ती जागा चमकवणे बहुधा विसरतात.

४ ) बॉनेटमधील नट-बोल्ट्स तपासा, त्यात गंज असणे योग्य नाही. दरवाजे, बोनट, डिकीच्या कोपऱ्यात गंज असतो. नवी अपहोल्स्ट्री असेल किंवा नवे सीट कव्हर असेल तर कव्हर हटवून ओरिजनल सीट तपासा. पाण्यामुळे सर्वात जास्त नुकसान सीटचेच होते. सीटचा खालचा भाग पाहा.

५ ) पाण्यामुळे खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स ओळखणे सोपे आहे, कारण बहुतांश वेळी ते काम करणे बंद करते. डॅशबोर्डचे लाइट सुरू आहेत की नाहीत हे इग्निशन सुरू करून पाहा. हेडलाइट्स, टेललाइट्स, इंडिकेटर्समध्येही पाणी घुसू शकते. सीपेजच्या खुणा दिसतात.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1196011915454976000?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1196015140245659648?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!