टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि विशेषकरून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. रोजच्या रोज मुंबईमध्ये कोरोन बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेकडून खास पत्रकारांच्या कोरोना चाचणीचं एक शिबीर घेण्यात आलं होत. या शिबिरात टेस्ट करण्यात आलल्या १६८ पैकी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर दिली आहे.
किरीट सोमय्या ट्वीटरवर म्हणाले, ‘मुंबई बीएमसी आणि टीव्ही इलेक्ट्रॉनिक जर्नलिस्ट असोसिएशनच्या विशेष शिबिरामध्ये कोरोनासाठी १६८ पैकी ५३ पत्रकारांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं ऐकून धक्का बसला. मी महाराष्ट्र सरकार आणि टीव्ही चॅनेलच्या मालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या उपचारांसाठी पावले उचलली पाहिजेत आणि उपचाराचा खर्च उचलावा . त्यांना विमा संरक्षण देखील मिळवे.’
Shocking to hear 53 of 168 Journalist's tested for Corona, found Positive in Special camp of Mumbai BMC & TV Electronic Journalist Association. I request Maharashtra Govt & TV Channel Owners to take steps/support their full Treatments. Also get them Insurance Cover @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 20, 2020
यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली चिंता –
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. त्या ट्वीटरवर म्हणाल्या,
‘५३ पत्रकारांना कोरोनाची लागण होणे हे गंभीर आहे.पत्रकार मित्र मैत्रिणींनी विशेषत: field वरील पत्रकारांनी काळजी घ्यावी.या कोरोना विरुद्धच्या लढाईतले आपण महत्वाचे सैनिक आहात.बातमी जितकी महत्त्वाची आहे तितकाच बातमीदारही.’
५३ पत्रकारांना कोरोनाची लागण होणे हे गंभीर आहे.पत्रकार मित्र मैत्रिणींनी विशेषत: field वरील पत्रकारांनी काळजी घ्यावी.या कोरोना विरुद्धच्या लढाईतले आपण महत्वाचे सैनिक आहात.बातमी जितकी महत्त्वाची आहे तितकाच बातमीदारही. pic.twitter.com/2OaZaELrb6
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 20, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

