नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यात भारत-नेपाळ देशांमध्ये विविध मुद्द्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या वादाची सुरुवात नेपाळने जाहीर केलेल्या नवीन नकाशावरून सुरु झाला होता. या नकाशात भारतातील काही भूभागांचा समावेश करत नेपाळने अधिकार सांगितला होता, त्यानंतर भारताने नाराजी व्यक्त केली होती. तर, आता जन्मस्थळांचा वाद भारत-नेपाळमध्ये सुरु असल्याचे देखील दिसत आहे.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमाला महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध यांना भारतीय असल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी आपली बाजू मांडली आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतात नव्हे तर नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. बुद्धांचं जन्मस्थळ युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीतील स्थळांपैकी एक आहे, असं नेपाळनं म्हटलं आहे.
‘राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत’
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सीआयआयच्या शिखर संमेलनात बोलताना म्हणाले, महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध असे भारतीय महापुरूष आहेत, ज्यांचं जग नेहमीच स्मरण करत असते. आतापर्यंतचे सर्वात महान भारतीय कोण असेल, तर मी म्हणेल गौतम बुद्ध आणि दुसरे महात्मा गांधी हे आहेत. त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात एका खाजगी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड जाहीर;स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश
तर, याआधी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी श्री रामाची जन्मभुमी हि भारताच्या अयोध्येत नसून नेपाळमध्ये असल्याचा दावा देखील केला होता. एवढेच नाही तर नेपाळमध्ये देखील राम मंदिर बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नेपाळची सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज कमिटीच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ठोरी आणि माडी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना काठमांडू येथे बोलावून भगवान श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
क्रेडाईचे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल
याचबरोबर, केपी शर्मा ओली यांनी माडी पालिकेचे नाव बदलून अयोध्यापुरी असे करण्यास सांगितले आहे. तसेच, परिसरातील जागा अधिग्रहण करून अयोध्यासारखे विकसित करण्यास सांगितले आहे. तसेच, याठिकाणी भव्य राम मंदिर बांधणे आणि राम-सीता आणि लक्ष्मण यांच्या मोठ्या मूर्ती तयार करण्यास सांगितले आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

