मुंबई : राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.
नीला सत्यनारायण 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण परिचित होत्या. नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं.
मोठी बातमी : आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता
सत्यनारायण यांनी प्रशासकीय सेवेसोबतच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता. त्यांनी सुमारे १५० कविताचे लेखन केले होते. तसेच काही मराठी आणि हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले होते. त्यांच्या एका कथेवर आधारलेला बाबांची शाळा हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
आनंदाची बातमी : कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा


