सोलापूर : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान, सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर रोजीच्या ‘भारत बंद’ला आता राजकीय पक्ष देखील पाठींबा देत आहेत.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्रा समिती (टीआरएस) या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मोदी सरकारसमोर आता मोठी कोंडी निर्माण झाली आहे.कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत. विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला असताना दुसरीकडे शेतकरी संघटनांच्या नेत्यांचीही बैठक सुरू आहे. आंदोलनाबाबतची पुढची रणनिती ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांचे नेते चर्चा करत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत.दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय (पुनम गेट) येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर आंदोलन करण्यात आले.यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाला पाठींबा मागण्या पूर्ण न झाल्यास, खेलरत्न पुरस्कार परत करणार
- नगरच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करणार – हसन मुश्रीफ
- ‘रावण खलनायक नव्हता’असं म्हणणारा सैफ अली खान होतोय ट्रोल
- ‘जे जे पक्ष काँग्रेस बरोबर गेले त्यांचे प्रचंड नुकसान झाले,शिवसेनेवर देखील हेच दिवस येणार’
- घरात अंधार आणि निघाले दिल्लीला उजेड पाडायला; बच्चू कडूंवर भाजपाचे टीकास्त्र

