🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. यात बागायती जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात नुकतीच आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
या भेटीनंतर के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नसल्याचे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले असल्याचा दावा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी केला आहे. दरम्यान या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे नेते राजकारण करत असून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगत ते भूसंपादन रद्द होणार असल्याचा कांगावा करीत आहेत. त्यांनी याबाबतचा कागद दाखवावा असे मत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले आहे.
राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता वेगळाच श्रेयवाद सुरू झाला आहे. आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर आता खा.सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे देखील सरसावले आहेत. या प्रश्नावर पावसाळी अधिवेशन संपल्यावर खरी वस्तुस्थिती मांडणार असल्याची माहिती खा.सुजय विखे यांनी दिली आहे.
के.के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली खरी परंतु त्यांनी संरक्षण विभागाचा के.के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही असा कागद जनतेला दाखवावा तरच आम्ही त्यांच्या प्रयत्नाला यश आले असे समजू आणि त्यांचे स्वागत करू व इतर निवडणुकीत त्यांना जाहीर पाठिंबा देऊ असे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी म्हटले आहे. दरम्यान राजकीय मंडळींच्या या श्रेयवादात बाधित गावातील जनतेच्या मनातील संभ्रम मात्र कायम आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- मोठी बातमी: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका
- राज्य सरकारचा मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर वैध ठरवण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण
- संसदेत गुंडागर्दी करणाऱ्या खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करा: केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
- कंगना राणावत नंतर आता आठवलेंचा पायल घोषलाही पाठिंबा
- दुःखद: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
