🕒 1 min read
मुंबई : सध्या देशात लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पोहचवताना होणाऱ्या तिकिटाच्या पैशांच्या वसुलीवरुन केंद्र सरकारवर टीका होत आहे.
याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात गेलेल्या मजूरांकडून रेल्वे तिकिटाचे पैसे वसूल करणे म्हणजे गरिबांची घोर चेष्टा आहे,’ अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात गेलेल्या मजूरांकडून रेल्वे तिकिटाचे पैसे वसूल करणे म्हणजे गरिबांची घोर चेष्टा आहे.दिवस कसा भागवायचा याची भ्रांत असताना त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे घ्यायचे हा कोणता न्याय? @PMOIndia ने या मजूरांना आपापल्या राज्यात मोफत सोडण्याची व्यवस्था करावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 3, 2020
‘दिवस कसा भागवायचा याची भ्रांत असताना त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे घ्यायचे हा कोणता न्याय? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने या मजूरांना आपापल्या राज्यात मोफत सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

