औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण देऊ शकेल का? मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात येणार होती. मात्र यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार होते. तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार असल्याचे ओवेसी यांनी शहरातील पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यावेळी खा. इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली होती. मात्र या रॅलीला आता परवानगी नाकारण्यात आली आहे.
Can Maharashtra govt justify permission for this rally of NCP while denying permission to us for our Nov 27 rally in Mumbai. Are laws different for different people in this state. Please reply @OfficeofUT @DGPMaharashtra pic.twitter.com/QvrMFamcjk
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) November 25, 2021
याबाबत खासदार जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, २७ नोव्हेंबरच्या मुंबईतील रॅलीसाठी आम्हाला परवानगी नाकारताना महाराष्ट्र सरकार राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी देऊ शकते. या राज्यात वेगवेगळ्या लोकांसाठी कायदे वेगळे आहेत का? कृपया उत्तर द्या. असे म्हणत खा. इम्तियाझ जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना टॅग करीत उत्तर मागितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मलिकांचा टोला
- ‘हा दिवस कधीही विसरणार नाही’, २६/११/ दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीदांना विराटने वाहिली श्रद्धांजली
- अर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
- नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर
- कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…


