टीम महाराष्ट्र देशा: विधानसभेचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन झाले आहे, मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डोळस हे २००९ आणि २०१४ साली राखीव मतदारसंघ असणाऱ्या माळशिरसमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले होते.
हनुमंतराव डोळस यांना कट्टर मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखले जात. २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांना विजयसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी दिली होती. त्यांनी चर्मकार महामंडळाचं अध्यक्षपदही सांभाळलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
