Share

बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारासह चौघांना ६ मार्चपर्यंत कोठडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

आमदार अनिल शिवाजीराव भोसले व त्यांच्या पत्नी आणि भाजप नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांच्यासह १६ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री आमदार अनिल भोसले यांच्यासह बँक अधिकारी शैलेश भोसले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ आणि बँक अधिकारी सूर्याजी जाधव यांना अटक केली आहे.

हा प्रकार २३ मे २०१९ पूर्वी घडलेला आहे. याप्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोसले दांपत्यासह १६ जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बँकेचे संचालक असलेल्या आमदार भोसले, एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती तपासात अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांना आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी –

शिवाजीराव भोसले सहकारी बँक अपहार प्रकरणी आमदार अनिल भोसले, सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले यांना शिवाजीनगर कोर्टाकडून ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!