Share

धक्कादायक : कोरोनामुळे झाला ‘या’ लोकप्रिय आमदाराचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

Published On: 

कोलकाता : कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी आणि नेते मंडळी सुद्धा या विषाणूच्या विळख्यातून सुटू शकले नाहीत. काही नेत्यांना करोनाची लागण झाल्याचं सर्वश्रुत आहेच पण आता कोरोनाने आणखी एका आमदाराचा देखील बळी घेतला आहे.

गोपीचंद पडळकर यांचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील आहेत- राष्ट्रवादी

पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचे बुधवारी निधन झाले.विशेष म्हणजे मे च्या अखेरीस ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. ते 60 वर्षांचा होते. त्यांच्यावर कोविड -19 चा उपचार सुरू होता. बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेली 35 वर्षे ते पक्षात होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. ममता यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘अत्यंत वाईट बातमी, फल्टा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार होते आणि 1998 चा पक्षाचा कोषागार सांभाळणारे तमोनश घोष आज आपल्यात नाहीत. ते 35 वर्षे आपल्या पक्षासोबत होते. ते पक्ष आणि जनतेसाठी एकनिष्ठ राहिले. सामाजिक कार्यात त्यांनी खूप हातभार लावला.’

दरम्यान, यापूर्वी करोना व्हायरसमुळे द्रमुकचे आमदार जे. अन्बझागन यांचा देखील मृत्यू झाला. जे. अन्बझागन हे आपल्या मतदारसंघात प्रचंड लोकप्रिय होते. ते चेन्नई पश्चिमचे द्रमुकचे सरचिटणीसही होते अनेक सामाजिक कामात ते मोठ्या जोशात सहभागी होत असत. असा लोकप्रिय नेता गमावल्याने त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

‘शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं’

दरम्यान,जळगाव भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाच्या आजाराने नुकतेच निधन झाले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यानंतर, त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!