Share

व्यंकय्या नायडूंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, ‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहून पाठवणार २० लाख पोस्ट कार्ड

Published On: 

मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.

महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.

तुम्ही कितीही रेकॉर्डवरून काढा, महाराज आमच्या रक्तात आहेत – यशोमती ठाकूर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व्यंकय्या नायडू यांना जय भवानी, जय शिवाजी लिहून २० लाख पोस्ट कार्ड पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे.

राज्यसभेच्या सदस्यत्वाचा शपथविधी होत असताना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी भाजपच्याच खासदाराला जय भवानी जय शिवाजी हा नारा दिल्यामुळे समज दिली असून यावरून भारतीय जनता पक्षाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी किती आदर आहे हे लक्षात येते. यावरून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्वेषी असल्याचे स्पष्ट होत असून या घटनेचा निषेध म्हणून आम्ही व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी लिहल्याचे २० लाख पोस्ट कार्ड पाठवणार आहोत, असे मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.

पावसाचे पुनरागमन: मुंबईसह उपनगरात हजेरी, तर राज्यभरात देखील सक्रिय होण्याचा अंदाज

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!