Share

तुम्ही कितीही रेकॉर्डवरून काढा, महाराज आमच्या रक्तात आहेत – यशोमती ठाकूर

Published On: 

मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.

महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

आता खऱ्या शिवसैनिक शोभता, कॉंग्रेस नेत्याकडून मराठीत शपथ घेणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींचं कौतुक

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावरून भाजपला लक्ष करत जोरदार घणाघात केला आहे. ‘जय भवानी ! जय शिवाजी !… कितीही रेकॉर्डवरून काढा, महाराज आमच्या रक्तात आहेत’. अस म्हणत यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधला आहे.

दिलासादायक: कोरोना चाचणीचे दर होणार कमी!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!