🕒 1 min read
मुंबई: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Assaduddin Owaisi) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर काल मेरठहून दिल्लीला परताना गोळ्या चालवत हल्ला केला गेला. या हल्ल्यात ओविसींना कोणतीही दुखापत झाली नाही. कारच्या दरवाज्यावर ह्या गोळ्या लागल्या. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांना झेड प्लस (Z+) सुरक्षा प्रदान केली गेली मात्र त्यांनी ती नाकारली.
याप्रकरणी गौतम बुद्ध नगर येथून सचिन आणि देवबंद, सहारनपुर येथून शुभम या आरोपींना हापुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांचकडून कसून चौकशी करत आहेत. मेरठ येथील ओविसींच्या सभेला हे आरोपी उपस्थित होते. या घटनेनंतर आरोपी सचिन याचे काही भाजप (BJP) नेत्यासोबत फोटो व्हायरल झाले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक (Nawab Malik) यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने या हल्ल्याची गंभीर दखल घेत कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी AIMIM चे स्टार प्रचारक यांच्यावर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचार सभेत हल्ला झाला. हे अश्या प्रकारचे हल्ले गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून त्याची दखल घेत आरोपींवर तातडीने कारवाई केली पाहिजे तसेच, नेते आणि प्रचारक आपल्या प्रचार कार्यक्रमांचे पत्र पोलिसांना देतात, त्यांनी तेथे विशेष पोलिस सुरक्षा दिली पहिले, अशी मागणी नवाब मालिक यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
- संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
- “मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प”, प्रवीण दरेकरांची टीका
- इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!
- ‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
- औरंगाबाद शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा-चंद्रकांत खैरे


