Share

सोमय्या यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केलाय – नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  –  गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर तसेच मंत्र्यांनी विविध आरोप करत आहेत.  ते फक्त आरोप करत नसून या नेत्यानावर  कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा देखील करत आहेत. या सर्व हल्ल्यांमुळे महाविकास आघाडी चांगलीच घायाळ झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, काल देखील सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने मलिक यांच्यावर टीका केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

ज्या संस्थेची किरीट सोमय्या बदनामी करत होते त्या संस्थेने सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून शिवडी कोर्टाने तसे आदेश पारित केले आहेत.विनाकारण बदनामी  करणाऱ्या लोकांच्या विरोधात कायद्याने कारवाई करता येते हे लोकांच्या लक्षात आले असून ही आता सुरुवात आहे असेही नवाब मलिक म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर कोर्टात दिवाणी व फौजदारी असे दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!