सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.
यावेळी अमित शहा बोलताना त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे. अमित शहा यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलेला आहेत. कोकणात निसर्ग वादळ आलं. मुख्यमंत्री या भागात किती वेळा आले. एकदाही नाही. पण देवेंद्र फडणवीस तीन वेळा आले. त्यांच्याकडून मी वादळाची माहिती घेत होतो. त्यांनी काजूच्या बागांनाही भेटी दिल्या. आमची जनतेशी बांधिलकी आहे.
पण या सरकारची ती राहिली नाही. हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ७५ टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यात तीन पक्षाची आघाडी असूनही हा कौल मिळाला आहे. त्यावरून जनता कुणाच्या पाठी आहे हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांना भाजपमध्ये त्रास होणार नाही, त्यांचा योग्य तो सन्मान होईल, असे आश्वासन दिले. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच भाजपने युतीधर्म पाळला, कोणतेही वचन मोडले नाही, उद्धव ठाकरे हेच ढळढळीत खोटं बोलत असल्याची टीका अमित शाह यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नाना पटोले ‘या’ तारखेला स्वीकारणार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा

