टीम महाराष्ट्र देशा: मेगाभरतीमुळेच भाजपचे कल्चर बिघडले आणि त्यामुळेच आमचे सरकार गेले अशा शब्दांत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काल पिंपरीतील कार्यक्रमात याबाबतचं वक्तव्य केलं होतं. तोच धागा पकडून खडसेंनी पुन्हा मनातील खदखद व्यक्त केली. एकनाथ खडसे जळगावातील त्यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलत होते.
निष्ठावंतांना डावलून अगली बार २२० पार, अशी घोषणा देत नवीन लोकांना संधी दिली, त्यांना लोकांनी हरवले. मेगाभरतीचा परिणाम निश्चितच निवडणुकीवेळी झाला आहे. आता तरी पक्ष नितीमध्ये बदल करेल, असा टोला खडसेंनी लगावला आहे.
मेगाभरती सुरु झाली आणि भाजपचे कल्चर थोडे विचलित झाले, अशी थेट कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
