Share

नाशिक ठरतेय कोरोनाचे ‘एक्झिटे वे’, जिल्ह्यातील दुसरा तर पालिका क्षेत्रातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त

Published On: 

नाशिक : जिल्ह्यातील दुसरा तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या रुग्णाला दोन्ही तपासण्या निगेटीव्ह आल्यानंतर आज त्याला दीर्घ आरोग्यासाठी शुभेच्छा देवून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील दुसरा तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला, हे आरोग्य यंत्रणेचे यश पाहून प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त होवून नाशिक ठरेल कोरोनाचे ‘एक्झिट वे’ असा आशावाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.

यावेळी अतिरीक्त शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंनत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. अजिता सांळुखे उपस्थित होते. गोविंद नगर येथील हा रुग्ण दिल्ली येथे जावून आला असल्याने असल्याने 4 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील स्त्रावाची चाचणी केल्यानंतर 6 एप्रिल त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. हा महानगर पालिकाक्षेत्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णावर योग्य उपचार करुन त्याला कोरोनामुक्त करण्यात यशस्वी झाले असल्याचे श्री. जगदाळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा चमू, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी खूप परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, नाशिक शहरासह मालेगाव येथे उपचार घेत असलेले सर्व कोरोना रुग्णही या रुग्णाप्रमाणेच लवकर बरे होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिक जिल्हा रेड झोन मधे गेला असल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून कुठल्याही व्यक्तीला रुग्णालयात येण्याची वेळ येवू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही डॉ. जगदाळे यांनी यावेळी केले.

माझ्या आनंदाचे श्रेय आरोग्य यंत्रणेला:

कोरोना आढळून आला तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. परंतु येथील आरोग्य यंत्रणेने माझ्या आजारावर उपचार करण्याबरोबर मला मानसिकरित्या देखील सक्षम केले. त्यामुळेचं मी आज कोरोनासारखे युध्द जिंकू शकलो आहे. त्यामुळे आजच्या माझ्या आनंदाचे श्रेय हे संपुर्ण आरोग्य यंत्रणेला आहे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी डॉक्टरांना व पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहनही कोरोनामुक्त रुग्णाने यावेळी नागरिकांना केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!