Share

नाशिक : कोणार्क नगर येथील पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Published On: 

नाशिक : नाशिक शहरातील कोणार्क नगर येथील कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी असलेल्या रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज शनिवारी पहाटेपासून या रुग्णास अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होऊ लागले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ व्हेंटीलेटरवर घेवून योग्य ते उपचार करण्यात आले. परंतु उपचारास संबंधित रुग्णाने कोणताही प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

कोणार्क नगर (आडगाव) येथे राहणारे पोलिस कर्मचारी (वय 51) यांनी मालेगाव येथे कर्तव्य बजावल्यानंतर 2 मे 2020 रोजी दुपारी वाजता त्यांना सौम्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात संशयित म्हणून भरती करण्यात आले होते.

सांगलीकरांनी ‘कोरोना’विरोधातील लढा अखेर जिंकला; जिल्ह्यातील शेवटचा रुग्णही कोरोनामुक्त

8 मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. परंतु आज 9 मे रोजी अचानक श्वसनाचा त्रास होवू लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. जगदाळे यांनी दिली आहे.

‘कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलिस यंत्रणेने घ्यावी’

#corona : सूट मिळाली म्हणून गैरफायदा घेऊ नका, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन करू : हसन मुश्रीफ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!